धनंजय मुंडेंनी केलं पीडित कुटुंबीयांचं सांत्वन, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली

Dhananjay Munde | बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते पंकजा मुंडे विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली. त्यावेळी बजरंग सोनवणे निवडून आले. याचपार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे.

पंकजा मुंडेंचा पराभव हा भाजप आणि पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या जिव्हारी लागल्याचं दिसून आलं. पंकजा मुंडेंना 6 हजार मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे बीड जिल्ह्यातील अनेकांचे डोळे पाणावले होते. तर काहींनी तर आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं.

धनंजय मुंडेंनी केलं पीडित कुटुंबीयांचं सांत्वन

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिंचोली गावात एक धक्कादायक घटना घडली होती. पोपट वायभासे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आता पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी त्यांच्या राहत्या घरी जात सांत्वन केलं आहे.

पोपट वायभसे यांनी पीडिताच्या घरी जात सांत्वन केलं. त्यावेळी बोलत असताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले की, निवडणुकांमध्ये जय-पराजय होत असतात. या विवंचनेतून आमच्या मनात कोणी जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे. कुटुंबासाठी कधीही भरून न निघणारे दुख आहे. त्यामुळे संयमाने जय-पराजय घ्यावेत. कोणतीही निवडणूक अंतिम नसते. कोणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, अशी भावना धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) व्यक्त केली आहे.

पोपटराव वायभसेंच्या मुलांना धनंजय मुंडेंकडून आर्थिक मदत

मृत व्यक्ती पोपटराव वायभसे यांना एक मुलगी आणि एक मुलगा, पत्नी असा त्यांचा परिवार आहे. दोन्ही लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचं धनजंय मुडेंनी (Dhananjay Munde) सांगितलं आहे. दोन्हीही मुलांच्या नावे प्रत्येकी अडीच लाख रूपये आर्थिक मुदत धनंजय मुंडेंनी केली.

News Title – Dhananjay Munde Financial Help To Popat Vaybhase Daughter And Son

महत्त्वाच्या बातम्या

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; येणारे दोन दिवस..

मोठी बातमी! नितीश कुमारांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात केलं दाखल

“अयोध्यावासियांनी भाजपमुक्त राम करुन दाखवला”; उद्धव ठाकरेंनी डिवचलं

SBI ग्राहकांना सर्वात मोठा झटका; बँकेने घेतला मोठा निर्णय

अखेर मलायकाने प्रेग्नंसीबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली ‘या महिन्यात बाळाला….’