Top News महाराष्ट्र मुंबई

धनंजय मुंडेंनी राजीनाम्यावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. रेणू शर्मा नावाच्या तरूणीने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काचा आरोप केला आहे. या आरोपामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर स्वत: धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राजीनाम्याबाबत शरद पवार आणि पक्षातील मोठे नेते विचार करतील आणि त्याबाबत निर्णय होईल, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

मी स्वतः शरद पवारांकडे स्पष्टीकरण दिलं आहे. बुधवारी सकाळीच मी त्यांची वेळ घेतली आणि भेटून सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि माझं व्यक्तीगत जे म्हणणं आहे ते मी प्रेसनोटच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना दिलं  असल्याचंही मुंडेंनी सांगितलं.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. यावर पक्ष म्हणून विचार करावा लागेल. धनंजय मुंडे यांनी मला सांगितलेली माहिती पक्षातील इतर सहकाऱ्यांना देणं हे माझं कर्तव्य असून पक्षातील सर्व नेत्यांशी बोलून चर्चा करू, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवारांच्या या सूचक वक्तव्यामुळे मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर तुम्ही तक्रार का देताय?, हेगडे म्हणाले…

“धनंजय मुंडेंवर माझा विश्वास ते स्वत:च राजीनामा देतील”

“माहिती लपविणं हा गुन्हा, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे”

मुंडे प्रकरणात मोठा ट्विस्ट; रेणू शर्माविरोधात तक्रार करण्यासाठी ‘हा’ भाजप नेता पोलिस स्थानकात

“राममंदिरनिर्माणाची तारीख विचारणारे धाराशिव, संभाजीनगरच्या नामांतराची तारीख कधी सांगणार?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या