फक्त 40 टक्के नव्हे, अख्खं सरकारच बिनकामचं; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

मुंबई | भाजपने केलेला गोपनीय सर्व्हेतून 40 टक्के आमदाराची कामगिरी चिंताजनक आहे, अशी माहिती उघड झाली होती. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार हल्ला चढवला.

फक्त 40 टक्के नव्हे, अख्खं सरकारच बिनकामचं आहे. त्यामुळे आम्ही जे बोलत होतो तेच रिपोर्टकार्डमधून समोर आलं आहे. त्यामुळे येणारा काळच या सरकारला आपली जागा दाखवेल, अशी टीका केली.

दरम्यान, भाजपने दिल्लीतील चाणक्य या संस्थेकडून आमदार खासदारांच्या कामगिरीबद्दल गुपचूप सर्व्हे केला. या सर्व्हेत राज्यातील भाजपच्या 40 टक्के आमदार धोक्यात आहेत. फ्री प्रेस जर्नल या दैनिकाने याबाबत वृत्त छापलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘SHIVDE I AM SORRY’ नंतर पिंपरीत ‘स्मार्ट बायका कुठे जातात? पोस्टरबाजीने खळबळ

-भाजपला सत्तेची मस्ती आली आहे, आता जनताच त्यांची मस्ती उतरवेल- सुप्रिया सुळे

-अजितदादा… आमच्याही पाठीवर हात ठेवून पहा!

-काँग्रेसला मोठा धक्का; जेष्ठ नेत्याच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश!

-मोदींच्या मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याची खुर्ची धोक्यात? पंतप्रधानांकडे सगळ्यांचं लक्ष