मुख्यमंत्रीसाहेब…हीच का तुमची पार्टी विथ डिफरन्स? धनंजय मुंडेंचा सवाल

पुणे | भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची अचानक बदली करण्यात आली. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.

घोटाळ्यात बुडालेल्या मंत्र्यांना क्लीनचिट तर देताच होतात पण कायदेशीर कारवाई करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांवरच कारवाईचा बडगा? कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे राज्यकर्त्यांचे आद्यकर्तव्य असते. हीच का तुमची पार्टी विथ डिफरन्स? असं ट्वीट मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान, गायकवाड यांची अचानकपणे बदली केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसंच मनसेने याविरोधात आंदोलनही केलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeTooमोहीमेमुळे पुरूषांनी महिलांवर आरोप केले तर काय होईल?- केंद्र मंत्र्यांची मुक्ताफळं

-मला मिठाई देणार का? मोदींचा लाभार्थ्यांना मराठीतून सवाल!

-#MeToo | नाना-तनुश्रीचा वाद राखी सावंतला अटक होण्याची शक्यता?

-फेमिनाच्या कव्हरपेजवर झळकला मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा फोटो

-मल्ल्याचा मल्हारराव होळकर होतो; जितेंद्र आव्हाड यांच्या फेसबुक पोस्टमुळे वाद

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या