बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाका”

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सध्या ईडी आणि सीबीआय मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. याला जास्त तर प्रमाणात भाजप नेते किरीट सोमय्या हे कारणीभुत ठरत आहेत. गत काही महिन्यांपासून सोमय्या यांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात फिरून महाविकास आघाडीच्या नाकी नऊ केलं होतं. आता पुन्हा सोमय्या यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

धनंजय मुंडे यांच्या मालकीच्या जगमित्र साखर कारखाना आहे. हा कारखाना ज्या जमीनीवर आहे ती जमीन मुंडे यांनी फसवणुकीनं बळकावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. इतकंच नाही तर 1988 मध्ये मरण पावलेल्या शेतकऱ्याचा अंगठा घेऊन मुंडे यांनी 2010 साली जमीन आपल्या नावावर केल्याचा खळबळजनक आरोप सोमय्य यांनी केला आहे.

फडणवीस सरकारच्या काळात जगमित्र कारखाना प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. पण धनंजय मुंडे यांनी आपल्याविरूद्धच्या गुन्हांमध्ये चालू असणारी चौकशी थांबवण्यात यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयानंच मुंडे यांच्याविरूद्धच्या गुन्ह्यांची चौकशी चालू करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांसोबत पुरावे देखील दाखवले आहेत. परिणामी आता धनंजय मुंडे यांच्या निमीत्तानं ईडी बीडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या 

राज्यभरातील शाळा सुरु करण्यासंदर्भात अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

अण्णा भाऊ साठे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये मला काहीही फरक दिसत नाही- मोहन भागवत

कोरोना लसीचा दुसरा डोस न घेतलेल्यांना अजित पवारांचा इशारा, म्हणाले…

अमोल कोल्हे म्हणतात, “…मग त्यांना जातीवादाची कावीळ झालीये, असं म्हणावं लागेल”

“…तर विरोधकांनी याची काळजी घ्यावी”, उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना डिवचलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More