बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे, ताई काळजी घ्या- धनंजय मुंडे

मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.

पंकजाताई, कोरोना विषाणूचा सामना मी दोन वेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई, अशी पोस्ट धनंजय मुंडेंनी केली आहे.

माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी लवकरात लवकर करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘नागडे राजकारणी, नागडं सरकार, नागडा देश, आरे हाड…’; आस्ताद काळेची पोस्ट व्हायरल

“9 लाख 17 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट पैसे जमा केले”

उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीचं आनंद महिंद्रांकडून कौतुक, म्हणाले…

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण!

उद्या बहिणीचं लग्न, आज भावाचा दुर्दैवी मृत्यू; इचलकरंजीतील हृदयद्रावक घटना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More