बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धनंजय मुंडेंची दिलदारी…फ्लाईट चुकलेल्या जवानाला काढून दिलं तिकीट!

औरंगाबाद | अडचणीत सापडलेल्या जवानाच्या मदतीला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंंजय मुंडे धावून गेले आहेत. त्यामुळे या जवानाला वेळेवर ड्यूटीवर जाता आलं. वैभव मुंडे असं या जवानाचं नाव असून तो बीएसएफ काश्मीरमध्ये कार्यरत आहेत.

श्रीनगरला कामावर रूजू व्हायला निघालेल्या वैभवचे औरंगाबाद येथून दिल्ली मार्गी श्रीनगरसाठी सकाळी 8 वाजता विमान होतं. पण औरंगाबादला येणाऱ्या रेल्वेला उशीर झाल्यामुळे विमानतळावर पोहचण्यास वैभवला वेळ लागल्याने श्रीनगरला जाणारं विमान चुकलं. यावेळी धनंजय मुंडे त्याच्या मदतीला धावून गेले.

मुंबईला निघालेल्या धनंजय मुंडे यांनी विमानतळावर भेटेल्या जवानाची चौकशी केली. घडलेला प्रकर कळताच धनंजय मुुंडे यांनी आपल्या कार्यालयामार्फत तात्काळ जवान वैभवसाठी एअर इंडियाच्या विमानाचं तिकीट औरंगाबाद-दिल्ली-श्रीनगर असं तिकीट काढून दिलं आहे.

दरम्यान, मुंडे यांनी ऐनवेळी केलेल्या मदतीबद्दल बीएसएफ जवान वैभव यानेही त्यांच्यातील संवेदनशील माणुसकीचे आभार मानले.

 

ट्रेंडिंग बातम्या- 

2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना टॅक्स, शिक्षण, नोकरीमध्ये सवलत नाही? शिवसेनेकडून विधेयक सादर

वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावे होणार हद्दपार?

महत्वाच्या बातम्या- 

“बजरंगबलीमुळे जिंकलात, आता शाळेत-मदरशांमध्ये हनुमान चालिसा शिकवा”

BSNLचा धमाका; 96 रुपयात महिनाभर रोज मिळणार 10GB 4G डाटा

बारामती शहराने मिळवला आणखी एक मान!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More