बीड महाराष्ट्र

धनंजय मुंडेंचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत; क्रेनद्वारे घातला फुलांचा हार

बीड | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्कारासारखी गंभीर तक्रार रेणू शर्माने मागे घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच धनंजय मुंडे औरंगाबादमध्ये दाखल झाले.

धनंजय मुंडे यांचं आज औरंगाबादमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. चिखलठाणा चौकात धनंजय मुंडे याचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं.

क्रेनच्या साहाय्याने धनंजय मुंडे यांना हार घालण्यात आला. तसेच धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, आजपर्यंत अनेक संकटाला सोमोरे गेलो. सामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करून आज इथपर्यंत पोहोचलो आहे. अंगावरील कातड्याचे जोडे करून आपल्याला दिले तरी तुमच्या उपकाराची परतफेड करू शकणार नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

कोरोनानंतर पुन्हा एकदा नाईट लाईफ सुरु करणार- आदित्य ठाकरे

“संजय राऊत महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांना कधी भेटले नाहीत”

“जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा…”

“राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करा”

गोरेगावमधील फिल्म स्टुडिओला भीषण आग!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या