धनंजय मुंडेंचा पक्षातूनच गेम होतोय ?; पालकमंत्रीपद लांबच राहिलं आता मंत्रिपदही जाणार?

Bell’s Palsy Disease

Dhananjay Munde | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या वाल्मिक कराड यांनी पुण्यात सीआयडीसमोर सरेंडर केलं होतं. वाल्मिक कराड (Walmik Karad) हे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे याप्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Dhananjay Munde यांचा पक्षातूनच गेम होतोय ?

बीडच्या प्रकरणावरून पालकमंत्रीपद त्यांच्यापासून दूर जात असल्याची चर्चा सुरू असताना आता त्यांना मंत्रिपदही सोडावे लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात पक्षातच नाराजी वाढत असल्याचं म्हटलं जात आहे.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर पक्षातील वरिष्ठ नेते नाराज आहेत. धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरण व्यवस्थित हाताळल नसल्याचं पक्षातील वरिष्ठ नेत्यांच मत आहे. मस्साजोग प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत असल्याची भावना पक्षाच्या नेत्यांमध्ये तयार झाली आहे.

अजित पवारांचं मौन

आपल्या पक्षाच्या मंत्र्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप होत असताना अजित पवार या सगळ्यावर काहीतरी भूमिका मांडतील असे अपेक्षित होते. मात्र, अजित पवार यांचे सध्याच्या काळातील मौन सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

अजित पवार सध्या नववर्षानिमित्त परदेशात असल्याची माहिती आहे. परदेशातून परत आल्यानंतर अजित पवार हे या विषयावर बोलतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खळबळजनक खुलासा, भर कार्यक्रमात म्हणाली ‘तो मला खूप…’

मस्साजोगच्या गावकऱ्यांचा अत्यंत धक्कादायक निर्णय, बघून पोलीसही हादरले

सरपंच हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले संदर्भात मोठी अपडेट समोर!

‘इथे सापडला की ठोकला’; वाल्मिक कराड शरण आल्यानंतर वसंत मोरेंचं मोठं वक्तव्य

बीड प्रकरणाशी धनंजय मुंडेंच्या जोडल्या जाणाऱ्या कनेक्शनवर अजितदादांच्या नेत्याचं मोठं भाष्य!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .