बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकरी बांधवांनो खचून जाऊ नका, सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी- धनंजय मुंडे

बीड | गेल्या काही दिवसांमागे परळी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पावसामुळे कडधान्यवर्गीय पिकांची हानी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अतिवृष्टी पाहणी दौरा केला. यावेळी धनजंय मुंडेंनी शेतकऱ्यांना खचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी आहे, असं म्हणत धीर दिला.

गोदावरीसह विविध नद्यांना आलेल्या पुरामुळे रस्ते आणि अन्य झालेल्या नुकसानीचाही यावेळी आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे सुरू आहेत. नुकसान झालेला एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी काळजीपूर्वक पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

शेतकरी बांधवांनी या कठीण प्रसंगात खचून जाऊ नये. पुन्हा उभारी घेण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, परळी तालुक्यातील गोदा काठच्या डिग्रस, पोहनेर, बोरखेड, तेलसमुख, ममदापुर आदी गावांना भेटी देऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

थोडक्यात बातम्या- 

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

अमेरिकेचा मोठा निर्णय! अफगाणिस्तानला करणार ‘इतक्या’ मिलीयन डाॅलर्सची मदत

शक्ती कायद्याबाबत गृहमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा, म्हणाले…

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More