बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परळीच्या वैद्यनाथ मंदिराला बाॅम्बने उडवण्याच्या धमकीनंतर धनंजय मुंडे म्हणतात…

बीड | देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ (Parli Vaijnath) मंदीर बाॅम्बने उडवलं जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. परळीमध्ये या धमकीनंतर प्रशासन सतर्क झालं असून पोलिसांकडून सदरील घटनेचा तपास सुरु आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde Tweet) यांनी ट्विट करत नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे. तसेच प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराची एक विटही इकडची तिकडे होऊ देणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवाय परळी आणि परिसरात अशा धमकीचं पत्र (Threat Letter) मंदीर व्यवस्थापनाला मिळाल्याने तणावाचं वातावरण पसरलं आहे. तसेच या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, डिजीपी आणि बीडच्या पोलिस अधिक्षकांना या घटनेची माहिती दिली असून पोलिस विभाग या घटनेची दखल घेत तात्काळ स्वरूपात अॅक्शन घेत आहे, असं धनंजय मुंडेंनी ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

परळी वैद्यनाथ मंदीर ट्रस्टला पत्र लिहून 50 लाखांची (50 Lakh Extortion) मागणी करणारे पत्र ज्याने लिहिले आहे, तो लवकरच गजाआड होईल, असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला आहे. तसेच नागरिकांनी घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

थोडक्यात बातम्या

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे मांजर”

“वीर दासने दोन भारत दाखवले म्हणून उच्चभ्रूंच्या कपाळात…”

शेअर बाजारात घसरण पण ‘बिगबुल’च्या शेअर्समध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ

मुंबईतील कोरोनाबाधितांसह मृतांची संख्याही दिलासादायक, वाचा ताजी आकडेवारी

“जरा जास्तच मुदत दिल्याबद्दल नारायण राणेेेंचे आभार”, जयंत पाटलांचा पलटवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More