Dhananjay Munde | बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग (Massajog) येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर (Santosh Deshmukh Murder Case) निर्माण झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे काही काळाच्या सार्वजनिक अनुपस्थितीनंतर आज महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) परळीतील (Parli) ध्वजवंदन सोहळ्याला उपस्थित राहिले. दुसरीकडे, जालना (Jalna) येथे मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
धनंजय मुंडेंचे पुनरागमन-
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह (Walmik Karad) सात जणांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. या घटनेनंतर, प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल झाल्यावर आणि मारहाणीचे (Dhananjay Munde) काही धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा त्याग केला होता.
राजीनाम्यासाठी (Dhananjay Munde) त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले होते. तेव्हापासून ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसले नव्हते. मात्र, अनेक दिवसांच्या विरामानंतर, आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ते परळी तहसील कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमाला उपस्थित राहिले, ज्यामुळे त्यांच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र दिनी परळी ध्वजवंदन संपन्न-
आज सकाळी परळी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात माजी मंत्री आणि विद्यमान आमदार (MLA) धनंजय मुंडे यांच्या हस्ते ठीक ८ वाजून ५ मिनिटांनी ध्वजवंदन करण्यात आले. या शासकीय कार्यक्रमाला तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, विविध विभागांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनंजय मुंडे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने ते काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते, त्यामुळे त्यांची आजची उपस्थिती विशेष ठरली.
त्याचबरोबर, जालना येथे जिल्ह्याच्या पालकमंत्री (Guardian Minister) आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पोलीस कवायत मैदानावर (Police Parade Ground) आयोजित महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन केले. या सोहळ्याला खासदार डॉ. कल्याण काळे (Dr. Kalyan Kale) आणि आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि पोलीस महासंचालक पदक (Director General of Police medal) प्राप्त पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मानही केला.