धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना दिली महाविकास आघाडीत यायची ऑफर?, म्हणाले…
मुंबई | डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ रूग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात अनेक दिग्गज राजकारण्यांनी हजेरी लावली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) हे बहिण भाऊ देखील उपस्थित होते.
बहिण-भावाच्या या जोडीने एकमेकांबद्दल केलेली वक्तव्ये व शाब्दिक कोट्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलं. या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना उद्देशून केलेल्या वक्तव्याची सध्या सगळीकडेच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
आमचं बहिण-भावांचं राजकीय वैर जगाला माहिती आहे. पण काही व्यक्तींसमोर आमचं वैर काहीही नाही. ती व्यक्ती त्यावेळी आमच्यासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे कदाचित पंकजा ताईंनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) लेन्सेस लावल्या तर बरं राहील, असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं आहे.
दरम्यान, धनंजय मुंडेंचं हे वक्तव्य म्हणजे पंकजा मुंडेंना महाविकास आघाडीत यायची ऑफर तर नाही ना, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तर या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या डोक्यावर मायेची टपली देखील मारली. बहिण भावंडांचा हा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
थोडक्यात बातम्या-
राज ठाकरेंची सभा होणार?, मनसे उद्या महत्त्वाची घोषणा करणार
‘…त्या धारेची किंमत मलाही मोजावी लागली’; शरद पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
राष्ट्रवादीनंतर काँग्रेसची शिवसेनेवरही नाराजी, नाना पटोले म्हणतात…
तृप्ती देसाईंची रूपाली चाकणकरांवर खोचक शब्दात टीका, म्हणाल्या…
मोठी बातमी! राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द, ‘हे’ मोठं कारण आलं समोर
Comments are closed.