“काही पण करा फडणवीस साहेब, मायच्यान पवार साहेबांचा नाद करु नका”

Dhananjay Munde Old Video Viral | 400 पार म्हणणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत चांगला धक्का बसला आहे. भाजपला स्वबळावर 300 जागा देखील पार करता आल्या नाही. यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला. भाजपला सर्वात मोठा धक्का बसलो तो म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात. महाराष्ट्रात भाजपच्या दिग्गज नेत्यांना देखील पराभव स्विकारावा लागला.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी काकांचा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस तोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना तोडली भाजप, शिंदे आणि अजितदादा यांनी एकत्रित निवडणूक लढवली. पण भाजपचा हा निर्णय स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारा ठरला.

महाराष्ट्रात महायुतीने सत्ता मिळवली पण जनतेचा विश्वास त्यांना जिंकता आला नाही. याचा फायदा मात्र देशात इंडिया आघाडीला झाला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला झाला.

शरद पवार किंगमेकर ठरले

महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली. पण या लोकसभेत शरद पवार किंगमेकर ठरल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. शरद पवारांवर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वांनी टीका केली. मात्र सोशल मीडियावर पवारांनी भाजपला धडा शिकवल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. सध्या अजित पवार गटात असलेल्या धनंजय मुंडेंचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

“पवार साहेबांचा नाद करु नका”

वया व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे काही पण करा फडणवीस साहेब, मायच्यान पवार साहेबांचा नाद करु नका, असं म्हणताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायर होत असून अनेकांनी यावर कमेंट देखील केल्या आहेत.

पवार साहेबांचा नाद केला आणि साहेब आम्हा दोघा बहिण भावाला कायमच घरी बसवलं म्हणून सांगत असतो पवार साहेबांचा नाद कोणी करू नका भोगा कमळाची फळ आता, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

लोकसभा निकालावर शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले ‘हिंदूच…’

‘सरकारमध्ये येणार पण..’;चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचं BJP वर दबावतंत्र, केली मोठी मागणी

मोठी बातमी! नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

एकनाथ शिंदेंचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?

घरच्या आमदारानं केला शशिकांत शिंदेंचा घात, अशी पडली साताऱ्यात जागा!

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .