…तर मला भर चौकात फाशी द्या- धनंजय मुंडे

नवी मुंबई |  आपण 16 मंत्र्यांवर केलेला भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला नाही, तर मला भर चौकात फाशी द्या, असं वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

आदिवासी मंत्र्यांनी आदिवासी लोकांसाठीच्या साहित्यात पैसे खाल्ले आहेत, सामाजिक न्याय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये पैसे खाल्ले आहेत. या लोकांनी लहान मुलांच्या चिक्कीतही पैसे मारले, असा घणाघाती आरोप त्यांनी भाजप शिवसेनेवर केला आहे.

90 हजार कोटींचा घोटाळा राष्ट्रवादीने पुराव्यानिशी काढला आहे, त्यात चौकशी करत नाही. उलट आमच्यावर मोदी आणि फडणवीस आरोप करतात, असा पलटवार त्यांनी केला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या परिवर्तन मेळाव्यात घणाघाती भाषण करून भाजप शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंचा पुन्हा एकदा व्यंगचित्रातून मोदींवर बोचरा वार

-अखेर नगरच्या 18 नगरसेवकांवर आली ‘संक्रांत’ मात्र जगताप पिता पुत्रांना राष्ट्रवादीचं अभय

-आता मला पाहायचंय, ‘सामना’चे संपादक काय लिहितात??- अजित पवार

-तू सिर्फ चाय बेच, देश मत बेच; छगन भुजबळांचा मोदींवर हल्लाबोल

-उत्तर प्रदेशात संपूर्ण ताकदीने लढणार आणि लोकांना सरप्राईज देणार!