छगन भुजबळ क्रांतिसूर्य, साहेब आहेत तोपर्यंत कुणालाही काहीही होणार नाही!

नाशिक | छगन भुजबळ हे क्रांतिसूर्य आहेत, मात्र आज आपल्याला त्यांच्याविनाच सभा घ्यावी लागत आहे, असे भावनिक उद्गार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काढले. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेच्या समारोप सभेत ते बोलत होते.

शरद पवारसाहेब जोपर्यंत आपल्या पाठिशी आहेत तोपर्यंत कोणालाही काहीही होणार नाही, असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

दत्तक घेतलेल्या नाशिकला मुख्यमंत्र्यांनी काहीच दिले नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलन केलं आणि या जाडजूड सरकारलाही वाकावं लागलं, असा टोलाही त्यांनी फडणवीस सरकारला यावेळी लगावला.