मुख्यमंत्र्यांना थोडी तरी जनाची नाही, मनाची लाज वाटायला पाहिजे!

मुंबई | आम्ही लाभ मिळवून दिलेल्या लाभार्थ्यांच्या जाहिराती फडणवीस सरकार करत आहे. थोडी तरी जनाची नाही ,मनाची लाज वाटायला पाहिजे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलीय. 

3 वर्षांच्या कार्यकाळात फडणवीस सरकारनं असं एकही काम केलं नाही का, की त्यांना जाहिरात करायला लाभार्थी मिळू नये?, असा सवालही धनंजय मुंडे यांनी विचारला. 

दरम्यान, सरकारच्या ‘मी लाभार्थी’ जाहिरातीवरुन मोठा वाद सध्या सुरु आहे. सरकार खोट्या जाहिराती करत असल्याचा आरोप आहे.