Loading...

धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांवर बरसले, …तर त्यांचे राजीनामे घ्या!

मुंबई |  मुख्यमंत्र्यांना जनाची नाही तर मनाची वाटत असेल तर त्यांनी गिरीश महाजन आणि सदाभाऊ खोत यांचा राजीनामा घ्यावा, असं राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. महाजनांचा उल्लेख त्यांनी पिस्तुलराव महाजन असा केला.

सुरुवातीचे 5 दिवस सरकार कुठे होतं हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्र्यांनी खरंतर महाजनादेश यात्रा रद्द करुन पूरग्रस्त ठिकाणी जाऊन काम केलं पाहिजे. मात्र या मुख्यमंत्र्यांना पुन्हा मीच मुख्यमंत्री झालं पाहिजे असं सांगण्याची घाई आहे, असं म्हणत धनंजय मुंडेंनी फडणवीसांवर जोरदार टीका केली.

Loading...

राष्ट्रवादीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरग्रस्तांसाठी 50 लाख रुपयांचा धनादेश दिला. खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पक्षातर्फे धनादेश दिला.

दरम्यान, पूरपरिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकातही भाजपचंच सरकार तरी पाणी सोडलं नाही”

-वंचितचं निवडणूक चिन्ह ठरलं; कुणाला ठेवणार ‘ग‌ॅस’वर??

-प्रतीक्षा संपली…! बहुचर्चित ‘पळशीची पीटी’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Loading...

-“पुलवामासारख्या घटनांचा जाब विचारला तर गद्दार ठरवलं जातं”

-कलम 370 हटवणं लोकशाहीविरोधी निर्णय- प्रियांका गांधी

Loading...