मुख्यमंत्री महोदय, मंत्रालय आहे का सर्कसचा फड???

मुंबई | मुख्यमंत्री महोदय, मंत्रालय आहे का सर्कसचा फड???, अशा शब्दात मंत्रालयात बसवलेल्या जाळ्यांवरुन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवर यासंदर्भात ट्विट केलंय. 

मंत्रालयात होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने मंत्रालयावर जाळ्या बांधण्याचा निर्णय घेतला असून आज याची अंमलबजावणी देखील करण्यात आली. त्यानंतर त्याचे फोटो काढून धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर पोस्ट केलेत. 

सरकारने नेटाने काम केलं असतं तर मंत्रालयात नेट लावण्याची वेळ आली नसती, असं त्यांनी म्हटलंय. तर मंत्रालयात जाळ्या आहेत की जाळ्यात मंत्रालय आहे, असा टोकदार सवालही त्यांनी विचारलाय.