“लोकं मला म्हणतात ‘हे’ पोरगं मुंडे साहेबांसारखं काम करतं…”

बीड | महाराष्ट्रात जिथे जिथे जातो, तिथे लोक मला म्हणतात “हे पोरगं मुंडे साहेबांसारखं काम करतंय” यापेक्षा माझ्यासाठी कोणताच मोठा गौरव नाही, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी मुंडे साहेबांवरती असलेलं अपार प्रेम त्यांनी बोलताना व्यक्त केलं.

पदे येतील, पदे जातील याची पर्वा मी कधी केली नाही आणि करणार सुद्धा नाही. पण गोपीनाथ मुंडे यांचं काम मी पुढे घेऊन जात आहे याचा मला आनंद आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, माझ्या कामातून मी स्वर्गीय गोपीनीथ मुंडेंना जिवंत ठेवतोय हे सगळ्यात मोठं कार्य माझ्या हातून घडतंय, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-आता राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार; पाहा कुणी केली ही घोषणा…

-राहुल गांधींनी ‘पप्पू’ नाही तर आता ‘पप्पा’ होण्याची गरज – रामदास आठवले

-ज्यांनी मला अटक केली त्यांनाच माझ्या अटकेचं कारण माहित नाही! – छगन भुजबळ

-विराट कोहलीला बाद ठरवण्याचा पंचांचा निर्णय साफ चुकीचा; सोशल मीडियावर एकच राडा

-मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका; अजित पवारांची कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती