महाराष्ट्र मुंबई

तोडपाणीचा आरोप असेल तर तो सिद्ध करा; धनंजय मुंडेंचं राज्य सरकराला आव्हान

मुंबई | तोडपाणीचा आरोप करायचा असेल तर तो सिद्ध करुन दाखवा. तुमच्याकडे सत्ता आहे. चौकशीस मी तयार आहे, असं थेट आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. 

मी 16 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले. त्यामुळे त्यांनी माझ्यावर वाटेल ते आरोप केले, मग एकाही मंत्र्याने माझ्यावर मानहानीचा दावा का केला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

मंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्याचे मी सभागृहामध्ये पुरावे दिले. माझा एक जरी पुरावा खोटा असता तर त्यांनी मला जगू दिलं असतं का?, असंही मुंडे म्हणाले आहेत. 

दरम्यान, आपण विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

जन्म देण्याआधी संमती घेतली नाही म्हणून आई-वडिलांविरुद्ध कोर्टात जाणार!

दिल्ली ठरलं स्वामीनाथन आयोग लागू करणार पहिलं राज्य

प्रियांका गांधींच्या रॅलीने काहीही फरक पडणार नाही- योगी आदित्यनाथ

प्रियांका गांधींनी काँग्रेस सरचिटणीस पदाची सूत्रे स्विकारली

एकनाथ खडसे भाजपचे स्टार प्रचारक; प्रचारासाठी मिळणार हेलीकॉप्टर?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या