…याचाच अर्थ मनोहर भिडेच सरकार चालवतात- धनंजय मुंडे

शिर्डी | शिवप्रतिष्ठाचे संभाजी भिडे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यावरून राजकिय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

राज्यापुढे अनेक मोठेमोठे प्रश्न आ वासून ऊभे आहेत. यातही सरकारमधील जेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील जर भीमा-कोरेगांव प्रकरणातील संदिग्ध आरोपी मनोहर भिडे यांना भेटण्यासाठी आपला वेळ खर्ची घालतात, अशी टीका मुंडेंनी केली. 

यावरून सरकार कशाला प्राधान्य देत आहे हे स्पष्ट होते, असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, अनेक प्रकरणात दोषी असूनही त्यांना क्लीन चिट मिळते. याचाच अर्थ तेच सरकार चालवत आहेत, अशी टीकाही मुंडे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

-दुष्काळग्रस्तांना मदत करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकार गंभीर नाही- धनंजय मुंडे

-भाजप सरकार संविधानविरोधी आहे- शरद पवार

-राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत- प्रकाश आंबेडकर

-‘साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात’; उदयनराजेंच्या समर्थकांची तोडफोड

-मला असली घाणेरडी गोष्ट करायची नाही; राखी सावंतनं लग्न मोडलं!