छोटा मोदी बोललं की कारवाई, मग शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्याचं काय?

अहमदनगर | हजारो कोटी रुपये बुडवून पळालेल्या नीरव मोदीला छोटा मोदी बोललं तर कारवाईची भाषा केली जाते, मग आमचं दैवत शिवरायांविषयी अपशब्द काढणाऱ्या भाजप नेत्यावर काय कारवाई करणार? असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. 

अहमदनगरच्या अकोले आणि कोपरगावमध्ये राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभा झाल्या. यावेळी श्रीपाद छिंदमच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. 

छत्रपती शिवाजी महाराज का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ, अशी जाहिरातबाजी करत सत्ता मिळवलेला भाजप हा फक्त सत्तेसाठी महाराजांच्या नावाचा वापर करतो. पण त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक आहे, असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.