“मोदींची भाषणं ऐकून मला ‘गजनी’तला आमिर खान आठवतो”

 पालघर  |   नरेंद्र मोदींची २०१४ सालच्या निवडणुकांपूर्वीची भाषणं आणि आताची भाषणं ऐकली की मला ‘गजनी’ चित्रपटातील आमीर खानची आठवण येते, अशी मिश्किल टिप्पणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मोदींनाही त्यांनी दिलेल्या असंख्य आश्वासनांचा विसर पडला आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

इथे विक्रमगडच्या चौकाचौकातही मोदींच्या अच्छे दिनची चेष्टा होत असेल, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला रायगडमधून सुरूवात झाली आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते भाजप-शिवसेनेवर सडकून टीका करताना दिसून येत आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्लेत- धनंजय मुंडे

-मुंबईतल्या उद्धव ठाकरेंच्या ‘घणाघाती भाषणातील’ प्रमुख मुद्दे एकाच ठिकाणी

-शिवसेनेला पटकणारा पैदा झाला नाही आणि पैदा होणारही नाही- उद्धव ठाकरे

-विष्णुचा अवतार राम मंदिर बांधू शकत नाही- उद्धव ठाकरे

-लाट कसली लाट, लाटेची लावू वाट; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात