तुम्ही काय झक मारत होतात का?; धनंजय मुंडेंचा सवाल

तुम्ही काय झक मारत होतात का?; धनंजय मुंडेंचा सवाल

मुंबई | एकीकडे म्हणता मराठा क्रांती मोर्चा होता, दुसरीकडे म्हणता दुसऱ्या संघटना होत्या, मात्र तुम्ही काय झक मारत होतात का?, असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारलाय. कोरेगाव भीमा गावात घडलेल्या हिंसाचार प्रकरणी ते बोलत होते.

सरकारने आरपीआयचे नेते रामदास आठवले यांची भूमिका स्पष्ट करावी. त्यांना काय वाटतं त्यासंदर्भात त्यांनी कारवाई करावी, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

घटना घडली त्यावेळी सरकार काय करत होतं? सरकारनं का दुर्लक्ष केलं? जबाबदार लोकांवर सरकार काय कारवाई करणार? हे रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना विचारायला हवं, असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. 

Google+ Linkedin