Top News

“उदयनराजेंच्या मागे कामाचा व्याप म्हणून ते शिवस्वराज्य यात्रेला आले नाही”

पुणे | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला असल्याचं दिसत आहे. उदयनराजे भोसले यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत तब्बल 2 तास चर्चा केली.

2 तासांच्या मॅरेथॉन चर्चाले उदयनराजे भोसले यांच्या सोबत आमदार शशिकांत शिंदे, धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. बैठक संपवून धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उदयनराजे कामात व्यस्त असल्याने ते शिवस्वराज्य यात्रेला येऊ शकले नाही, असं मुंडे म्हणाले.

आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे मुद्दे आणि रणनीतीवर चर्चा करण्यात आली. उदयनराजेंची कोणतीही नाराजी नाही. ते पक्षातच असून बाहेर जाण्याची चर्चा झालेले नाही. ते कधीही भाजपच्या प्रवेशावर बोलले नाहीत. मात्र भाजपच्या गोटातून माध्यमांच्या माध्यमातून ही चर्चा केली जात आहे, असंही मुंडे म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांच्या भेटीनंतर उदयनराजेंचं ‘राष्ट्रवादी पुन्हा’ ठरल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या