बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच धनंजय मुंडेंची ‘विजयी’ फेसबुक पोस्ट, म्हणतात…

मुंबई |   राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात करत कोरोनाविरूद्धचं युद्ध जिंकलं आहे. आज त्यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याबरोबर त्यांनी विजयी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या फेसबुक पोस्टमधून त्यांनी उपचार करणारे डॉक्टर, नर्स तसंच त्यांना आशीर्वाद देणारे त्यांचे हितचिंतक यांचे आभार मानले आहेत.

सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने मी कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालो. आज डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी माझी काळजी घेतली. सगळ्यांचे मनापासून आभार🙏 हलगर्जीपणा करू नका, सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. आपण कोरोनारुपी संकटावर नक्की मात करू, अशाआशयाची फेसबुक पोस्ट त्यांनी केली आहे.

दरम्यान, सर्वांत आधी मंत्री जितेंद्र आव्हाड त्यापाठोपाठ मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता या तिन्ही नेत्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

कृषी मंत्र्यांचं स्टिंग ऑपरेशन, कामचुकार अधिकाऱ्यावर केली कारवाई

जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल!

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शब्द

‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी अमित ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

आणखी एक परीक्षा पुढे ढकलली, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More