Dhananjay Munde | |बीड जिल्ह्यातील मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी (CID) कडे सोपवण्यात आला असून, विशेष तपास पथक (SIT) देखील स्थापन करण्यात आले आहे. या प्रकरणातील तपासामध्ये सीआयडीने महत्त्वपूर्ण आरोपपत्र दाखल केले असून, त्यानुसार वाल्मिक कराड (Walmik Karad) हा हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संतोष देशमुख यांनी खंडणीला विरोध केल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचं सीआयडीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या अहवालानंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर प्रचंड दबाव वाढला होता. सोमवारी सोशल मीडियावर संतोष देशमुख यांच्या हत्येचे अमानुष फोटो व्हायरल झाल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून, अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या राजीनाम्याला मंजुरी दिली आहे.
संभाजी भिडेंची प्रतिक्रिया
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (Shivpratishthan Hindustan) संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “सर्व राजकीय नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला पाहिजे,” असे भिडे गुरुजी यांनी स्पष्ट केले. “नेत्यांनी न्याय, शिस्त आणि कर्तव्यभावना शिकावी,” असे त्यांनी पुढे सांगितले.
Dhananjay Munde | राजकीय आणि सामाजिक पडसाद
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करत आहेत. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी तपास वेगाने होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठा गोंधळ निर्माण केला आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही या प्रकरणावर मोठे राजकीय वादळ उठले असून, पुढील तपासाची दिशा महत्त्वाची ठरणार आहे.