बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर प्रीतम मुंडे खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवतायत हे सिद्ध होईल”

नांदेड | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. परळीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत काल चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना प्रीतम मुंडे यानी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. आता धनंजय मुंडेंनी प्रीतम मुंडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. प्रीतम मुंडे या सत्ताधारी पक्षाच्या खासदार आहेत. त्यांनी ओबीसी आरक्षण केंद्र सरकारकडून टिकवावं. प्रीतम मुंंडे यांनी असं केल्यास खऱ्या अर्थाने त्या स्वर्गीय गोपिनाथ मुंडेंचा वारसा चालवत आहेत हे सिद्ध होईल, असा खोचक टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. ते आज नांदेड दौऱ्यावर असताना बोलत होते.

दरम्यान, ओबीसींच्या आरक्षण प्रश्नासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील एकातरी मंत्र्यात आहे का? तसेच केंद्राकडून सगळं मागायचं असेल तर राज्य चालवायला केंद्राकडून माणूस मागून घ्या. भाजपमध्ये खूप खमके माणसं आहेत. राज्य चांगल्या पद्धतीने चालवू शकतात, असा टोला प्रीतम मुंडे यांनी ठाकरे सरकारला लगावला होता.

तसेच महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसीचे आरक्षण रद्द झालं. राज्य सरकार कोरोनातील कुठल्याही प्रश्नासंदर्भात केंद्र सरकार काहीच देत नाही, असं म्हणत आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. केंद्राने हे केले नाही, ते केले नाही. मग राज्य चालवायला माणूस मागून घ्या, असंही त्या म्हणाल्या होत्या.

थोडक्यात बातम्या – 

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

मोठी बातमी! ‘या’ राज्यात 6 जुलैपासून शिक्षण संस्था चालू होणार; वाचा काय आहेत गाईडलाईन्स

खासदार नुसरत जहाॅंनं बेबी बम्पसोबत शेअर केले खास फोटो

आजपासून ‘या’ जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन खुल्या बाजारात मिळणार

“गोपीचंद पडळकर बांडगुळ आहे आणि अशी बांडगुळं वाढत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More