बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेने ‘करुन’ नाही तर ‘भरुन’ दाखवलं- धनंजय मुंडे

मुंबई | शिवसेना-भाजपने काही करुन नाही पण मुंबईत पाणी ‘भरुन’ दाखवलं एवढं मात्र नक्की, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल आहे.

कितीही पाऊस पडला तरीही मुंबईत पाणी तुंबणार नाही. असा दावा सत्ताधारी भाजप-सेना करत होते. पण मुंबापुरीची तुंबापुरी झाली, असंही मुंडे म्हणाले आहेत.

मुंबई तुंबलेली नाही. तुम्ही उगाच प्रश्न करत आहात, असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणतात. शिवसेनेचे खासदारही म्हणतात की, मालाडची घटना हे पालिकेचं अपयश नाही तर एक अपघात आहे.

दरम्यान, मुंबईतील मुसळधार पाऊस, वाहतूक कोंडी आणि अपघातानं बेजार झालेल्या मुंबईकरांवर राजकीय नेते बेताल वक्तव्य करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-आदित्य ठाकरे म्हणतात ही नैसर्गिक स्थिती; मुंबई महापालिकेला दोष देऊ नका

-मालाड दुर्घटना पालिकेचं अपयश नाही तर तो एक अपघात- संजय राऊत

-गरज असेल तरच घराबाहेर पडा; प्रशासनाचं पुणेकरांना आवाहन

-मुंबईत पावसाने करुन दाखवलंय; ‘मातोश्री’जवळ तुंबलं पाणी

-नारायण राणे नाही लढले तर देवदत्त सामंतच निवडणूक लढणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More