महाराष्ट्र मुंबई

“धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा, मंत्रीपदावर राहण्याचा त्यांना हक्क नाही”

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी आपण 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. तसेच आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली, असा मोठा खुलासा केला. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडलंय.

सामाजिक न्याय मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलंय.

भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि आम्हीही आता या विषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या-

‘कोरोना लसीवर विश्वास नसेल तर पाकिस्तानात निघून जावं’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

17 वर्षीय दिव्यांग मुलीवर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

‘निवडणुकीत पुरुष नेत्यांशी संपर्क असेल तरच महिलांना तिकीट’; राष्टीय महिला आयोगाच्या अध्यक्षांचं वक्तव्य

कलियुगातील संजीवनी मुंबईत आली- महापौर किशोरी पेडणेकर

भंडारा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्यपालांकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या