बीड महाराष्ट्र

सांगितलं होतं पवारांचा नाद करू नका, पण..- धनंजय मुंडे

औरंगाबाद | भाजपने मधल्या काळात फोडाफोडी केली होती. त्यावेळी भाजपाला सांगितलं होतं की पवारसाहेबांचा नाद करु नका. पण सुधारणार नाहीत, असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांची अंबाजोगाईमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.

सत्ता स्थापन झाल्यानंतर मला एकाने विचारलं लोकशाही काय आहे? मी म्हणालो, या देशाला विधानसभेच्या निवडणुकीनंतर लोकशाही दाखवली आहे. 64 आमदारांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, 54 आमदार असलेल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री होतो, 44 आमदारांच्या पक्षाचे मंत्री बनतात आणि 105 आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो, त्याला लोकशाही म्हणतात, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

पवारसाहेब की लाठी ऐसी बैठी है, बहुत दिनों के बाद पता चला है की कैसी बैठी है, असं म्हणत मुंडेंनी भाजपवर निशाणा साधलाय.

महत्वाच्या बातम्या-

शहीद जवान संग्राम पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरात दाखल

“पक्षात कुणालाही कोणतंही पद मिळतं, फाईव्ह स्टार कल्चरने निवडणुका जिंकता येत नाहीत”

गोव्यात समविचारी पक्षांशी युतीची तयारी- प्रफुल्ल पटेल

“महामारीचे बाप बनून लोकांच्या जिवाशी का खेळता?”

आम्हाला चंपा, टरबुजा बोललेलं कसं चालतं?- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या