अब्रू वाचवण्यासाठी माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला- धनंजय मुंडे
बीड | भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी डिसीसी बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. यावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.
पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला, अशी बोचरी टीका धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर केली आहे. तसेच कोणी निवडणुकीवर बहिष्कार घातला, कुणाला मागील कारभाराचा पश्चाताप झाला किंवा कुणी माघार घेतली तरीही निवडणुकीला शंभर टक्के क्षमतेने सामोरे जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडावी, असं धनंजय मुंडे म्हणाले.
सहकार मंत्र्यांनी यांनी जिल्हा बँक संदर्भात जो निर्णय दिला. त्यानिर्णया विरोधात माजी मंत्री हाय कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढले. हायकोर्टाने सहकार मंत्र्यांना दिलेला निर्णय कायम ठेवला. हायकोर्टाने दिलेला निर्णय भाजपाच्या माजी मंत्र्यांना मात्र मान्य झालं नाही. भाजपाकडे मतदार जास्त असताना देखील बहिष्कार टाकणं म्हणजे, यांचं मतदार यांचं ऐकत नाहीत अशी स्थिती दिसून येत आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
एखाद्या राजकीय पक्षाने ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणं म्हणजे त्यांना विजयाबद्दल तीळ मात्र विश्वास नसल्याचं लक्षण आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
मलायका अरोराचा हॉट अंदाज; शेअर केला जीममध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ, पाहा व्हिडीओ
“नागपुरात जन्म घेतलेली संघटना…”; राहुल गांधींची संघावर बोचरी टीका
“इतरांना तुच्छ लेखण्याचा महाजनांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला”
‘मेधा कुलकर्णी आपण एका जीवाचा बळी घेतलाय’; रूपाली चाकणकरांचा मेधा कुलकर्णींवर गंभीर आरोप
डोक्यात कोयत्याने वार करत नातवानेच केला आजोबांचा खून; कारण ऐकून सुन्न व्हाल
Comments are closed.