देशाची राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही; धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा

बीड |  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली समतेची राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. ते बीडमध्ये बोलत होते.

लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली लढाई आहे. सत्ताधाऱ्यांकडून वारंवार संविधान बदलण्याची भाषा होत आहे. त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंकडून जाहीर सभेत अनावधानाने घटना बदलण्याचा उल्लेख झाला होता. त्याचाच धागा पकडत धनंजय मुंडेंनी पंकजांवर निशाना साधलाय.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या

-पाण्यावरुन राजकारण करणाऱ्यांनो पुणेकर तुम्हाला नक्कीच पाण्यात बुडवणार- गिरीश बापट

-अमरावतीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे!

पुण्याला ‘योग सिटी’ अशी ओळख मिळवून देणार; गिरीश बापटांची ग्वाही

-…म्हणजे कळेल तुम्ही कोणामुळे निवडून आलात; उदयनराजेंचा चंद्रकांत दादांना टोला

‘यापुढे असं बोलायचं नाही’; भरसभेत शरद पवारांची अमरसिंह पंडितांना ताकीद