Top News बीड महाराष्ट्र

“उतणार नाही मातणार नाही, तुम्हाला दिलेला शब्द कधीही खाली पडू देणार नाही”

बीड | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं मुळ गाव असलेल्या नाथरा गावामध्ये अनेक कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी छोटेखानी कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमावेळी बोलताना मुंडेंनी आपल्या भाषणात बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या.

माझ्या 25 वर्षाच्या राजकारणामध्ये आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये काम करताना तुम्ही दिलेल्या प्रेमाने मला पुढील कामासाठीन नक्कीच प्रेरणा मिळेल. त्यामुळे उतणार नाही मातणार नाही तुम्हाला दिलेला शब्द खाली पडू देणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

जगात कितीही कौतुक झाले सत्कार झाले आशीर्वाद मिळाले तरीही आपल्या मातीत आपला झालेल्या सत्काराची किंमतच करता येत नसल्याचं मुंडे आपल्या भाषणात म्हणाले.

दरम्यान, आपल्याला मिळणारी आमदारकी आणि जिल्हा परिषदेचं पद हे कसं मिळालं नाही. हे सांगताना मुंडेंनी राजकारणात ध चा प कसा झाला याचा उल्लेख जाहीरपणे भाषणात केला.

थोडक्यात बातम्या-

“देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”

भाजपला आणखी एक झटका,’या’ माजी आमदाराने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

गॅस दरवाढीची मोदींच्या दाढीशी सुरू असलेली स्पर्धा थांबवा- रूपाली चाकणकर

‘या’ तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या, अन्यथा…- राकेश टिकैत

“राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या