उस्मानाबाद | राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून जोरदार राजकारण पेटलं आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसूली संचनालयानं अटक केल्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील वाद वाढला आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मलिक यांच्या कारवाईवरून ईडीवर जोरदार टीका केली आहे.
भाजपच्या अंगातली मस्ती अजून गेली नाही. होत्याचं नव्हत केलं तरी भल्या भल्यांच्या मागं ईडी, इन्कम टॅक्सची छापेमारी सुरू आहे. ईडीची तर ईज्जत ठेवली नाही ईडीपेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातील बिडीची किंमत जास्त आहे, अशी खरमरीत टीका मुंडेंनी केली आहे. भाजपची खरी जिरवायची असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीला सत्ता द्या, असं मुंडे म्हणाले आहेत.
शरद पवार साहेबांनी भाजपला चांगलाच धडा शिकवला आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. खऱ्या अर्थानं लोकशाहीचं दर्शन कोणी घडवलं असेल तर ते शरद पवार साहेबांनी भाजपला घडवलं आहे, असा टोला मुंडेनी भाजपला लगावला आहे. भाजप आता कधीच महाराष्ट्राच्या नादाला लागणार नाही, असंही मुंडे म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना मुंडेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. व्यासपिठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील होते.
थोडक्यात बातम्या –
बिगुल वाजलं! आयपीएलचं वेळापत्रक जाहीर; पाहा तुमच्या आवडत्या संघाचा सामना कधी होणार?
“कोणाला सांगताय म्हातारा झालोय, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत थकणार नाही”
“पुणे महापालिकेत येणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान”
मोठी बातमी! एसटी महामंडळातील नोकरभरती बंद
“त्यावेळी सुशीलकुमार शिंदेंचं तिकिट कापलं अन् मला अश्रू अनावर झाले”
Comments are closed.