मोठी बातमी! धनंजय मुंडेंची शुद्ध हरपली, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मुंबई | राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची शुद्ध हरपल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
धनंजय मुंडे यांना अचानक किरकोळ त्रास जाणवू लागला. त्यानंतर मुंडेंना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. धनंजय मुंडेना उपचारासाठी ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) देखील रूग्णालयात पोहोचले.
राजेश टोपे यांनी रूग्णालयात जाऊन धनंजय मुंडेंची चौकशी केली व डॉक्टरांची देखील भेट घेतली. डॉक्टर धनंजय मुंडेंच्या प्रकृतीवर लक्ष्य ठेवून असून त्यांनी एमआरआय (MRI) देखील केलं आहे. तर सध्या सर्व नॉर्मल असल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत.
दरम्यान, काळजी करण्याचे काही कारण नसून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. तर कामाच्या तणावामुळे धनंजय मुंडे यांना अचानक त्रास झाला असू शकतो, अशी शक्यता राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे.
थोडक्यात बातम्या-
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस; स्कायमेटचा अंदाज
“3 तारखेपर्यंत भोंगे उतरवा अन्यथा…”; राज ठाकरेंचा सरकारला अल्टीमेटम
“हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार”, राज ठाकरे कडाडले
“सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे”
“माझा डीएनए चेक करण्यात आला”, मनसेचे मुस्लीम नेते भावूक
Comments are closed.