मुंबई | राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60 तर दुसरे म्हणतात 50 जिंकू…आहेत त्या 8 टिकल्या तरी खूप झाले, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीला लगावला होता. यावरून मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आशिष शेलारांवर टीकास्त्र सोडलं आहे.
पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं!पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!, असं आशिष शेलार म्हणाले होते.
दरम्यान, आज केंद्रात फक्त तूमच्या पक्षासाठी आलेले “अच्छे दिन” हे तूमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातले तुमच्या पक्षासाठी आलेले “बुरे दिन” हे अशाच अहंकाराचं फळ आहे, आता तरी सुधरा राव, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शेलारांना प्रत्युत्तर दिलं.
पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय… https://t.co/DtEgVUYXCd
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 2, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“पोंक्षे, औषध वेळेवर घेत चला, डोक्यावर परिणाम होतोय”
औरंगाबादच्या नामांतराला रामदास आठवलेंचा विरोध
महत्वाच्या बातम्या-
“हा डोक्यावर पडलाय काय?, काय बोलतो याचं याला कळेना”
माजी आमदार हर्षवर्धन जाधवांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
आदित्य ठाकरेंची पाठराखण करत रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
Comments are closed.