वाढदिवसाला हारतुरे नको विद्यार्थ्यांना मदत करा; धनंजय मुंडेंचं आवाहन

बीड | माझ्या वाढदिवसाला हारतुरे भेट देण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना मदत करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, बालमृत्यूचे तांडव सुरू आहेत. अशा परिस्थितीत येत्या १५ जुलै रोजी असलेल्या माझ्या वाढदिवशी कसलीही शो-बाजी, पोस्टरबाजी कार्यकर्त्यांनी करू नये, अशी विनंती धनंजय मुंडेंनी केली आहे.

अवाजवी खर्च टाळून आपल्या परिसरातील गरजू शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांना मदत करून माझा वाढदिवस साधेपणाने साजरा करावा, असं धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करून म्हटलं आहे.

मला भेट देण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या/पुस्तके या स्वरूपात मदत आणा. खऱ्याअर्थाने ह्याच माझ्या वाढदिवसाला आपण दिलेल्या शुभेच्छा असतीलस असंही मुंडेंनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-भाजप पैशांच्या बळावर सरकार पाडतं- राहुल गांधी

-टीम इंडियाच्या पराभवानंतर विवेक ओबेरॉयचं ट्विट; चाहते संतापले

-अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून आयपीएस अधिकाऱ्याचा मोठा दावा

-मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

-डावी आणि उजवी विचारसरणी यापुढे अस्तित्वात राहणार नाही- आदित्य ठाकरे

Loading...