बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवडणुकी आधी जे भाजपत गेले त्या सगळ्यांची वाट लागली- धनंजय मुंडे

बीड | अनेकांना वाटत होतं भाजप सत्तेवर येणार. तसं वाटल्यामुळे जे जे भाजपच्या वाटेवर गेले त्या सगळ्यांची वाट लागली, असं वक्तव्य बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदारांची भावना होती की एक पक्ष बाजूला ठेवा. चार पक्ष एकत्रित या आणि सत्ता स्थापन करा पण भाजपला बाजूला ठेवा, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

तुमच्या भावनेतून निर्माण झालेलं हे सरकार आहे. म्हणून तुमच्या भावना हे महाविकास आघाडीचं सरकार कधीही दुखावणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, बीड जिल्हा मागासलेला आहे. तो कलंक कधीच आपल्याला पुसता आलेला नाही. सत्तेच्या या पाच वर्षात मागासलेपणाचा कलंक पुसून काढू, असं आश्वासन धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना दिलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पाच वर्षात कामं केली असती, तर आंदोलनाची वेळ आली नसती- छगन भुजबळ

यापुढे समाजसेवक म्हणून काम करणार- पंकजा मुंडे

महत्वाच्या बातम्या- 

“अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्याचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही”

देशात CAA, NCR, NPR लागू झालं तर गांधी हरतील आणि जीना जिंकतील- शशी थरूर

काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधींची नियुक्ती?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More