महाराष्ट्र मुंबई

करूणा शर्मांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर त्यांच्या मुलांना चित्रकूट बंगल्यात गेल्या तीन महिन्यांपासून डांबून ठेवल्याचा आरोप केलाय. यावर आता धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

करूणा शर्मा यांच्या बाबतीत मी यापूर्वीच खुलासा केला आहे. करूणा शर्मा यांना न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसून माझी निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणं हाच हेतू दिसतोय, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.

ही बाब न्यायप्रवीष्ठ असून न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो बंधनकारकच असणार आहे. तसेच माझ्यावर करूणा शर्मा यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, करूणा शर्मा यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.

थोडक्यात बातम्या-

शेतकरी आंदोलन : सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्विटनं एकच खळबळ

मी राज्यपाल नाही, तर…- भगतसिंह कोश्यारी

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी मिया खलिफा नेमकी कोण आहे?, पाहा फोटो

मला कोणी खलनायक ठरवलं तरी चालेल, पण…- उद्धव ठाकरे

करुणा धनंजय मुंडेंचा तक्रार अर्ज आला समोर; केलेत ‘हे’ 6 धक्कादायक आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या