महाराष्ट्र मुंबई

किशोरीताई, तुम्ही खरा आदर्श निर्माण केला आहे- धनंजय मुंडे

मुंबई | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नायर रुग्णालयात परिचारिकेच्या वेषात जाऊन तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हुरुप वाढवला. महापौरांनी फेसबुक पेजवर फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी किशोरी पेडणेकर यांचं कौतुक केलं आहे. तसेच त्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

किशोरी ताई तुमचे आभार. मुंबई महानगर पालिकेच्या महापौर पदाचा मान राखत, कोरोनाच्या युद्धात लोकांची सेवा करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरलेल्या किशोरीताई पेडणेकर यांनी आपल्या समोर खरा आदर्श निर्माण केला आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, काही पत्रकारांच्या संपर्कात आल्यामुळे किशोरी पडणेकर यांनी स्वत:हून 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. या काळात त्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि व्हॉट्सअॅपद्वारे घरुनच महापालिकेची सर्व कामे करत होत्या.

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

पत्ते खेळणं पडलं महागात; 40 जणांना झाली कोरोनाची बाधा!

राजा कायम पण ताण वाढेल; पाहा आणखी काय म्हटलंय भेंडवळच्या भविष्यवाणीत

फेसबुक-जिओ भागिदारीचा नवा अध्याय; व्हॉट्सअपच्या मदतीनं ‘जिओमार्ट’ सुरु

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या