औरंगाबाद महाराष्ट्र

प्रत्येक रक्षाबंधनला पंकजा आणि प्रितमताई या दोघींचीही आठवण येते- धनंजय मुंडे

बीड | प्रत्येक रक्षाबंधनाला मला राजकारणातील माझ्या बहिणींची आठवण आल्याशिवाय निश्चितच राहत नाही. आजच्यादिवशी पंकजा आणि प्रितमताई या दोघींचीही आठवण येतीये, अशा भावना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

आम्ही वेगळे होण्याअगोदर माझ्या आयुष्यात रक्षाबंधऩाच्या दिवशी पहिली राखी पंकजाताईनी बांधली आहे. आणि भाऊबीजेची पहिली ओवाळणी सुद्धा पंकजाताईनेच केली आहे, अशी आठवण धनंजय मुंडे यांनी सांगितली आहे.

आमच्या नात्यात राजकारणामुळे दुरावा निर्माण झाला असला तरी नात्यात संवाद असावा अशीच माझी कायम भूमिका राहिली आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

निवडणुकीच्या काळामध्ये मला माझ्या पक्षाची भूमिका असते, पक्षाचा विचार असतो. तसंच, पंकजा ताईनांही पक्षांची भूमिका ही असेतच. मात्र निवडणुकीदरम्यान आरोप-प्रत्यारोप होत असताना एक मर्यादा मी निश्चितच पाळतो, असं धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे.

व्हॉट्सअपवर बातम्या हव्या असतील तर 8275536080 हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर Start असा मेसेज पाठवा…

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांना वाटतं आम्हीच ज्ञानी आहोत- विखे पाटील

-बापाला शुभेच्छा देणार नाहीस का?; ट्विटरवर ट्रेंड सुरु

-पबजी खेळण्याचं व्यसन लागलं; अन् त्यासाठी चोरल्या 8 सायकली

-“हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा…”

-“तुम्हाला 70 वर्षात जमलं नाही, ते आम्ही 70 दिवसात करुन दाखवलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या