मुंबई | माझे वडील स्व. पंडितअण्णा मुंडे यांनी एकेकाळी ऊस तोडलेला आहे, मला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांची, अडचणींची जाणीव आहे, असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची जबाबदारी मी सामाजिक न्याय विभागाकडे मागून घेतली आहे. ऊसतोड कामगारांना सामाजिक न्याय विभागाकडून विशेष सहाय्य मिळवून देणार आहे, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
माथाडी कामगार कायद्याप्रमाणे ऊसतोड कामगारांसाठी येत्या अधिवेशनात कायदा अस्तित्वात आणणार असल्याची घोषणाही यावेळी धनंजय मुंडेंनी केली आहे.
ऊसतोड कामगार नोंदणी, आरोग्य विमा संरक्षण या बाबी येत्या काही दिवसांत पूर्ण करून, ऊसतोड कामगार कायदा येत्या अधिवेशनात अस्तित्वात आणू, अशी घोषणा धनंजय मुंडे यांनी केली.
थोडक्यात बातम्या-
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुणे पोलिसांकडून अटक; पाहा काय आहे प्रकरण…
आणखी स्वस्त झाली कोरोना चाचणी; जाणून घ्या काय आहेत नवीन दर!
भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय पंतप्रधान मोदींना जात- मुकेश अंबानी
कोरोनाची लागण झालेले मंत्री अनिल विज यांची प्रकृती बिघडली
भाजप हीच खरी तुकडे तुकडे गँग- सुखबीर सिंग बादल