Top News पुणे महाराष्ट्र

“ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत आला त्या वेळेस पवार साहेबांनी शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला”

पुणे | ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत आला त्या वेळेस पवार साहेबांनी शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचं राष्ट्रवादी नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. पुण्यात ते माध्यमांशी ते बोलत होते.

धनंजय मुंडेंनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आजपर्यंत ज्या क्षमतेने काम केलं त्यापेक्षा जास्त क्षमतेने महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात संकल्प केला असल्याचं मुंडे म्हणाले. यावेळी पत्रकारांनी त्यांना दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावर त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली.

आम्ही किसान आंदोलनातील शेतकऱ्यांसोबत आहोत. ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत आला त्या वेळेस पवार साहेबांनी शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मग ते आंदोलनातून असो किंवा सत्तेत असताना मंत्री म्हणून असो, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या वर्षात नवीन योजना आणल्या जाणार असल्याचंही मुंडेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

‘सामना’च्या अग्रलेखातील भाषेबाबत रश्मी वहिनींना पत्र लिहिणार- चंद्रकांत पाटील

“काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का, असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला?”

‘सरपंच पदाचा लिलाव म्हणजे…’; अण्णा हजारेंचं मोठं वक्तव्य

आयटीआयची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू!

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आरोग्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या