Top News महाराष्ट्र मुंबई

‘पूजा चव्हाणची हत्या नाही तर…’; धनंजय मुंडेंचं पूजाच्या आत्महत्येबाबत मोठं वक्तव्य!

Photo Credit- Pooja chavan FB Account | Dhananjay Munde Fb Account

मुंबई | बीडमधील परळी वैजनाथच्या पूजा चव्हाण या तरूणीने 8 फेब्रुवारीला पुण्यातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. पूजाच्या आत्महत्येशी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा चव्हाणची हत्या नाही तर तो पूर्णपणे आत्महत्येचा प्रकार आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत त्यासोबतच या प्रकरणाची चौकशीही सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणावर चौकशीनंतर यावर अधिक बोलता येईल, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षाने या प्रकरणावरून कथित मंत्री असलेल्या शिवसेनेच्या संजय राठोड यांचं जाहीरपणे नाव घेत त्यांच्यावर टीका केली होती. याआधी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करूणा शर्मा नावाच्या तरूणीने केले होते. या प्रकरणावरून सरकारवर टीका करताना मुंडेंवरही विरोधक निशाणा साधतात. यावर लहू चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आमची मुलगी अशा प्रकारचं कृत्य करणार नाही तिच्यावर पुर्ण विश्वास होता असं म्हणत लहू चव्हाण यांनी पूजाच्या आत्महत्येचं राजकारण थांबवा, असं आवाहनही केलं आहे. आमची मुलगी चांगली होती उगाच तिला बदनाम करत असल्याचं पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे?- नितेश राणे

पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

रोहित पवार-अहिल्याबाईंसंदर्भात शरद पवार असं काय बोलले?, ज्यामुळे होतेय जोरदार टीका

“…त्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवणं यात पुरुषार्थ आहे का?”

‘पडळकराचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती’; जयंत पाटलांचा पडळकरांना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या