बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर प्रश्नांना यश येतं”

मुंबई | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी जनसंवाद दौरा महाराष्ट्रात सुरू केला आहे. या दौऱ्यादरम्यान बीडमध्ये बोलताना, मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असं वक्तव्य केलं होतं. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडेंनी परळीमध्ये माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना संभाजीराजेंच्या वक्तव्यावर प्रश्व विचारला. यावर, सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही. चळवळ चांगली केली तर चळवळीतील प्रश्नांना यश येतं. त्यामुळे मनात प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये, असं धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी बोलताना धनंजय मुंडेंनी मराठा,ओबीसी आरक्षणासह विधानसभेच्या अध्यक्षपदावरही भाष्य केलं.

महाविकास आघाडीचे सरकार मराठा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी सक्षमपणे कोर्टात लढणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. तर विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार आहे. वायफळ चर्चेला काहीच अर्थ नाही,  असंही मुंडेंनी सांगितलं.

दरम्यान, बीडमधील संवाद यात्रेत संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रश्व विचारायला सुरूवात केली. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यंमंत्रीपदावर बसवा, असं म्हटलं होतं. संभाजीराजेंच्यां मुख्यमंत्री बनवा या वक्तव्याने त्यांची मुख्यमंत्रिपदाची होण्याची इच्छा ओठावर आली असल्याच्या चर्चांणा राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणे कोरोनामुक्तीकडे! कोरोनाच्या घटत्या रूग्णसंख्येमुळे पुण्यातील ‘हे’ जम्बो कोव्हिड सेंटर बंद

पोलीस विभागाबाबत महत्त्वाची बातमी! ‘पोलीस शिपाईही होणार पीएसआय’, गृहमंत्री वळसे-पाटलांचा प्रस्ताव

“राज्य सरकार वारकऱ्यांना देखील सोडत नाही, त्यांचीही मुस्कटदाबी करत आहे”

एक आजार ज्यामुळे आपलं होत आहे दगडात रुपांतर , ‘या’ चिमुकलीचं शरीर झालं दगडागत!

कल्पना चावलानंतर ‘ही’ भारतीय तरुणी घेणार अंतराळात झेप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More