आयपीएस अधिकाऱ्याशी धनंजय मुंडेंची शाब्दीक चकमक!

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या परभणीतीस सभेत ‘डी झोन’मध्ये शिरलेल्या कार्यकर्त्यांना उठवण्याचा प्रयत्न केल्यावरुन सहायक पोलीस नितीन बगाटे आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यात बाचाबाची झाली. ही घटना गुरुवारी परभणीतील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात घडली.

शरद पवारांच्या उपस्थितीत परभणीत मेळावा होता. शरद पवार यांना सुरक्षा असल्याने त्यांना डी झोन तयार करण्यात येतो. त्याच्या डी झोनमध्ये कोणालाही प्रवेश करता येत नाही.

शरद पवार भाषणासाठी व्यासपीठावर जाताच त्यांच्या मागे हजारो कार्यकर्त्ये डी झोनमध्ये शिरले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी बगाटे यांनी तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा धनजंय मुंडे व्यासपीठावरुन खाली आले.

कार्यकर्त्यांना बसू द्या, असं धनंजय मुंडेंनी सांगितलं तेव्हा बगाटे आणि मुंडे यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली.

दरम्यान, या घटनेनंतर सर्वजण डी झोनमध्येच बसून राहिले होते.

महत्त्वाच्या बातम्या –