मुंबई | रेणू शर्मा यांच्या वकिलाने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रेणूच्या भावाला आणि वहिनीला धमकी दिली गेली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तुझ्या बहिणीला तक्रार परत घ्यायला लाव नाहीतर तुझ्या परिवाराला खंडणीच्या गुन्ह्यात आतमध्ये टाकेल. तुम्हा लोकांना माझी पॉवर माहिती नाही अशी धमकी धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप रेणूच्या वकिलाकडून करण्यात आला आहे.
आम्हाला पोलीस सहकार्य करत नाहीत. अर्धच स्टेटमेंट्स घेतलं आहे. यामुळे आम्ही कोर्टात जाऊ, असं रेणूच्या वकिलांनी सांगितलं आहे.
रेणू शर्मा सध्या डीएन नगर पोलीस स्थानकांमध्ये असून तिचा जबाब नोंदवण्यात येत आहे. गेल्या चार तासापासून ही चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
“धनंजय मुंडेंवर आरोप झाले, मग त्यांना लगेच फासावर चढवायचं का?”
“करुणा आणि रेणू शर्मा दोघीही एकाच घरात राहतात, मग मोठी बहीण का बोलत नाही?”
आज त्यांनी मुंडेंना टार्गेट केलं, काही वर्षांपूर्वी त्या जागी मी असू शकलो असतो- कृष्णा हेगडे
धनंजय मुंडेंनी राजीनाम्यावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…
मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर तुम्ही तक्रार का देताय?, हेगडे म्हणाले…