बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तेव्हा अजितदादा मला म्हणाले, अरे हरभजनदेखील मॅच जिंकून देतो”

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील मैत्री सर्वांनाच माहिती आहे. भर सभेत दोन्ही नेते एकमेकांचं कौतुक करताना देखील दिसतात. अशातच आता धनंजय मुंडे यांनी मागील एका सभेचा किस्सा मुलाखतीत सांगितला आहे.

श्रीरामपुरात एक सभा झाली होती, त्यावेळी अजित पवारांनी मला त्यांच्या भाषणानंतर बोलायला सांगितलं. मात्र, प्रोटोकाॅल असल्याने मी बोलण्यास नकार दिला होता. मात्र, शेवटी अजितदादांनी आदेश दिल्याने मी भाषण केलं. त्यावेळी भाषणात बोलताना मी विराट कोहलीनंतर हरभजन खेळतोय, असा उल्लेख केला होता, असं धनंजय मुंडे म्हणाले.

त्यावेळी अरे हरभजन देखील सामना जिंकून देतो, हे तू विसरू नको, असा सल्ला मागून अजित पवारांनी त्यावेळी मला दिला होता. त्यावेळी लोकांची सभा ऐकायची मनस्थिती नव्हती. त्यावेळी मी वळसे पाटलांना म्हणलो, मी ही सभा जिवंत करून दाखवतो. त्यावेळी लोक घोषणा देत होते आणि टाळ्याही वाजवल्या होत्या, असं मुंडे यांनी सांगितलं.

दरम्यान, वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या शाबासकीची अशीही आठवणी धनंजय मुंडे यांनी जाग्या केल्या आहेत. माझ्या भाषणात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव आहे. अनेकांना माझ्या भाषणात महाजन, मुंडे आणि आर आर आबा देखील दिसतात, असंही मुंडे यावेळी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“तो दिवस लांब नाही, राज्यात भाजपचं सरकार येणारच”

नव्या कोरोना व्हेरियंटची दहशत; यंत्रणांना दिले सज्ज राहण्याचे आदेश!

“नारायण राणेंचा मार्च कुठला ते शोधावं लागेल, पाच वर्ष होतील पण…”

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मोदी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

जगाला टेन्शन देणारा ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’ आहे तरी काय?; वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More